वाघ जंगलातील वन्यप्राण्याची शिकार करताना एक व्हीडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल झालाय
  • 3 years ago
वाघ जंगलातील वन्यप्राण्याची शिकार करताना एक व्हीडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल झालाय. पेंच व्याघ्र प्रकल्पातील हा व्हीडिओ आहे.
तीन दिवसांपूर्वी चोरबाहुली गेटजवळ एका पर्यटकानं
हा व्हीडिओ शूट केला आहे.. त्यात एक वाघ गवतामध्ये सांभाराच्या पिल्लाची शिकार करताना दिसत आहे.. घाटमारा नावाच्या वाघिणीने ही शिकार केली आहे.. घाटमारा वाघिण जंगलात फिरत असताना तिला हरणांचा कॉल ( आवाज ) ऐकू आला... त्यामुळे ती सावध होऊन चार ही दिशेने पाहू लागली... तेवढ्यात तिला गवतामध्ये हरणाचा पाडस पडताना दिसला.. थोड्यावेळ आपलं जणू काही लक्षच नसल्याचं दाखवत घाटमारा  वाघिणीनं अगदी विद्युत वेगानं आपल्या शिकारीवर झडप टाकली.. आणि क्षणात पाडसाचा श्वास रोखून त्याचा जीव घेतल्यानंतर आपली शिकार घेवून
लगेच ती निघून गेली. हे संपूर्ण घटनाक्रम पर्यटकांनी चित्रित केले आहे... गेल्या काही महिन्यांपासून नागपूर नजीकच्या पेंचच्या जंगलात व्याघ्रदर्शन हमखास होत असल्यानं पर्यटकांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.
Recommended