पुण्यातील मांजरी गावात रस्ते शोधायचे कुठे ? | Pune | Maharashtra | Sakal Media |
  • 3 years ago
पुणे-सोलापूर रस्त्यापासून मांजरीकडे जाणाऱ्या प्रमुख रस्त्याचीही गल्लीबोळांतील रस्त्यांसारखीच अवस्था आहे. या गावातील वाहतूक सुरक्षित होण्यासाठी २७ किलोमीटर लांबीचे रस्ते हवे असल्याचे गावकरी सांगत आहे. हद्दीलगतची २३ गावे महापालिकेत आली खरी; पण तेथील सद्यःस्थिती नेमकी काय आहे, त्यावर उपाय आखले जातील का, ते नेमकी कधी, त्यासाठीची प्रक्रिया याबाबत गावकऱ्यांत साशंकता आहे. या पार्श्‍वभूमीवर प्रातिनिधिक स्वरूपात मांजरी गावाची पाहणी करून तेथील सुविधांचा आढावा घेण्यात आला. तेव्हा एवढ्या प्रमाणात विस्तारलेल्या गावात रस्ते, वाहतूक, पाणी आरोग्य या सोयीसुविधा तोकड्या असल्याचे दिसून आले.तरी गावात भल्यामोठ्या इमारती उभारल्या. त्या-त्या इमारतींमधील रहिवाशांना किमान पायाभूत सुविधा दिल्या गेल्या; पण गाव म्हणून नियोजन न झाल्याने रस्त्यालगत बांधकामे थाटली जाऊन रस्ते अरुंद झाल्याचे दिसत आहेत. त्यामुळे गावात सर्वत्र वाहतूक कोंडीचे चित्र ठळकपणे दिसत आहे.
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.
Recommended