दुचाकी चोरायचे बकरी चोरी करण्यासाठी ! | Pune | Maharashtra | Sakal Media |
  • 3 years ago
आरोपीकडुन 28 लाखाच्या 36 दुचाकी जप्त
पुणे, ता. 23 : दुचाकी चोरी करुन त्याद्वारे पुण्यासह सोलापूर व नगरमध्ये बकऱ्या चोरी करणाऱ्या "कुरैशी गैंग"मधील एका सदस्याला खडकी पोलिसांनी बेडया ठोकल्या. आरोपीकडुन पोलिसांनी 28 लाख रुपये किंमतीच्या 36 दुचाकी जप्त केल्या आहेत. राज्यात बकरी चोरी करण्याचा कुरेशी गॅंगने सपाटा लावला होता.

ऍलेक्‍स लॉरेन्स ग्रॅम्स असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. त्याच्या इतर चार साथीदारांचा पोलिस शोध घेत आहेत.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्ता गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, खडकी पोलिस ठाण्याच्या हद्दीत सोनाराच्या दुकानावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असताना एक टोळी जेरबंद करण्यात आली होती. यावेळी ऍलेक्‍स हा अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला होता. त्याचा माग काढत असताना, पोलिसांना दररोज त्याच्या कारनाम्याची नवनवी माहिती मिळत होती. त्यानूसार त्याने अनेक वाहन चोरीचे व बकरी चोरीचे गुन्हे केले असल्याचे उघड झाले. त्याला ताब्यात घेतल्यानंतर तो कुरेसी गॅंगचा सक्रीय सदस्य असल्याची माहिती मिळाली. त्याने व त्याच्या साथीदारांनी पुणे, नगर, सोलापूरसह अनेक जिल्हयातून गोठ्यात बांधलेल्या तसेच चरायला सोडलेल्या बकऱ्या चोरुन नेल्याचे उघड झाले. ते ग्रामीण भागात जाऊन बकऱ्या चोरत होते. यानंतर चोरलेल्या गाड्यांचे नुकसान करुन त्या निर्जन ठिकाणी सोडत होते. चोरलेल्या बकऱ्या तातडीने कसायाला विकल्या जात होत्या. 
त्याने 50 पेक्षा जास्त वाहन चोरीच्या गुन्हयाची कबुली दिली आहे. आरोपीने पुणे, पिंपरी-चिंचवड , सोलापूर, नगर व इतर जिल्हयात गुन्हे केले आहेत. त्याच्याकडून 26 दुचाकी, चारचाकी सहा, तीनचाकी चार अशा एकून 36 गाड्या हस्तगत करण्यात आल्या आहे. तर बकरी चोरीच्या चार गुन्हयासह त्याचे 40 गुन्हे उघडकीस आले आहेत. 
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.
Recommended