मुंबईत हाय प्रोफाइल पार्टीतून सुरेश रैना, गुरु रंधवा, बादशाह यांची अटक आणि सुटका | Mumbai | Sakal |
  • 3 years ago
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमी वर राज्य सरकारने हॉटेल सुरु करणाऱ्याला परवानगी दिली मात्र नियमांना न जुगारता अनेक हॉटेल रात्री उशिरा पर्यन्त नियमांचे पालन ना करता सुरु ठेवले जात आहेत. काल रात्री मुंबई तीळ ड्रॅगन फ्लाय क्लब वर पोलिसांनी छापा मारला या कारवाई मध्ये त्या ठिकाणी क्रिकेटपटू सुरेश रैना ,रितिक रोशनची पूर्वाश्रमीच्या पत्नी सुझान खान ,गायक गुरु रंधावा,बादशहा उपस्थति असल्याचा समजले. या वेळी त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले होते. मुंबई विमानतळाजवळील मुंबई ड्रॅगनफ्लाय क्लबवर छापा टाकल्यानंतर त्यांना अटक करण्यात आल्याचे समजते. तसेच त्यांना नंतर जामिनावर सोडण्यात आले आहे. मिळालेल्या वृत्तानुसार हा छापा टाकल्यानंतर एकूण ३४ जणांना अटक करण्यात आली. यात ७ क्लबच्या स्टाफ सदस्यांचाही समावेश आहे. कोविड नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल आणि आयपीसीच्या सेक्शन १८८,२६८ व ३४ खाली ही कारवाई करण्यात आली असल्याचे बोलले जात आहे.संपूर्ण राज्यात नाईट कर्फ्यु असताना नाईट पार्टी केल्यामुळे आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सहार पोलीस स्टेशनचे सिनीयर पीआय म्हणाले, गुरु रंधावा व क्रिकेटर सुरेश रैना हे त्या लोकांमध्ये आहेत, ज्यांना आम्ही ताब्यात घेतले होते.
#sureshraina #gururandhava #badshah #sakal #mumbai
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.
Recommended