आम्ही कधीही मराठा आरक्षणाला विरोध केला नाही : छगन भुजबळ | Chagan Bhujbal | Maratha | Sakal Media |

  • 3 years ago
पुणे : महात्मा फुले यांच्या १३० व्या पुण्यतिथीनिमित्त गंज पेठ येथील समता भूमी येथे अन्न आणि पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी भेट दिली. यावेळी माध्यमांशी बोलताना, वर्षपुर्तीबाबत, विरोधकांच काम काय असते, विरोध करणे. ते त्यांचे काम करत आहे. सरकार आपले काय काम करत आहे.

महाआघाडी सरकारने महात्मा फुलेंच्या नावावर शेतकऱ्यांसाठी योजना आखली, त्यासाठी २० हजार कोटी खर्च केले, विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रात पुर आला, त्यासाठी १० हजार कोटी रुपये खर्च केले. लॉकडाऊन असताना, तिजोरीत पैसा येत नसताना, सरकारने सुध्दा पुर्णपणे आरोग्यासाठी जे काही खर्च करता येईल ते केले. असे स्पष्टीकरण देखील भुजबळ यांनी दिली.

''आम्ही कधीही मराठा आरक्षणाला विरोध केला नाही. आघाडी सरकारच्या काळात कायदा केला. आम्ही पाठिंबा दिला. भाजप सराकराने कायदा केला, आम्ही पाठिंबा दिला. भाजप, काँग्रेस, राष्ट्र्र्रवादी काँग्रेस, शिवसेना सर्वांच म्हणणे, असे आहे की, ओबीसीला धक्का न लावू देता मराठा आरक्षण मिळाले पाहिजे. पण काही मराठा समाजाचे नेते म्हणतायेत, ओबीसी आरक्षण रद्द करा.
#chaganbhujbal #maratha #marathaaarakshan #aarakshan #sakal
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Recommended