जनजागृतीसाठी शहरातील तरुणांचा "चॉक फॉर शेम' उपक्रम | Pune | Cigarrete | Campaign | Sakal Media

  • 3 years ago
पुणे, ता. 23 : तुम्ही सिगारेट ओढल्यानंतर त्याचे थोटके उघड्यावर टाकताय
का? आता तुम्ही टाकलेल्या सिगारेटच्या थोटक्‍यांची संख्याही मोजण्यात येत
आहे. होय...! शहरातील कोणत्या भागात आणि किती प्रमाणात सिगारेट ओढण्यात
येत आहे. याची दखल घेण्यासाठी पुण्यातील तरुणांनी "चॉक फॉर शेम' या अनोख्या मोहिमेची सुरवात केली आहे. नागरिकांकडून सिगारेट ओढल्यानंतर त्याची थोटके रस्त्यावर सर्रासपणे टाकण्यात येत असल्यामुळे त्यांना उचलण्याऐवजी त्या भोवती खडूने रिंगण बनवत तेथे आकडे टाकण्यात येत आहे. सिगारेट विरोधात नागरिकांची जनजागृती करण्यासाठी पुणे प्लॉगर्सतर्फे ही मोहीम राबविण्यात येत आहे.
#Pune #Cigarette #Smoke #Sakal #SakalMedia Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Recommended