श्री ब्रम्हचैतन्य महाराज समाधी मंदिर भाविकांसाठी खूले

  • 3 years ago
गोंदवले (जि.सातारा) : गेल्या आठ महिन्यांनंतर श्री ब्रम्हचैतन्य महाराज समाधीच्या प्रत्यक्ष दर्शनाने मंगलमय तेवढाच भावनिक सोहळा आज (साेमवार) गोंदवल्यात पाहायला मिळाला. शिस्तीचा वारसा जपत समाधी मंदिर समितीने केलेल्या उपाययोजनांमुळे भविक सुखावले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिरे दर्शनासाठी कधी खुली होणार या भाविकांच्या प्रश्नाला दीपावली पाडव्यादिवशी पूर्णविराम मिळाला. गोंदवल्यातील श्री ब्रह्मचैतन्य महाराज समाधी मंदिर देखील भाविकांना दर्शनासाठी खुले झाल्याने भाविक आनंदून गेल्याचे पाहायला मिळाले.
Video - फिराेज तांबाेळी, गाेंदवले.
#Sakal #SakalMedia #Viral #News #Maharashtra #Satara #Gondawale #TrendingVideo

Recommended