जनावरांना मिळेल स्वतःची ओळख! | Latest Marathi News I Live Marathi News | ठळक बातम्या | Sakal Media |
  • 3 years ago
उमरेड (जि. नागपूर) : स्थानिक पशुधन विकास अधिकारी, तालुका लघु पशु चिकित्सालय, उमरेड यांच्या मार्फत सरकारच्या वतीने ग्रामीण भागातील तसेच शहरातील दूध उत्पादकांच्या दुभत्या व अन्य लहानमोठ्या सर्वच जनावरांची नोंद करून घेत त्यांना आधारकार्ड लावण्याची मोहीम राबविण्यात येत आहे. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. योगेश राघोर्ते यांची चमू उमरेड शहरातील जनावरांना बिल्ले लावताना दिसून आली. सकाळ प्रतिनिधीने त्यांच्याकडून लावण्यात येणाऱ्या आधारकार्ड बद्दल तसेच वर्षभरात राबविण्यात येणाऱ्या लसीकरण कार्यक्रमाची माहिती जाणून घेतली. बिल्ला लावल्यामुळे नैसर्गिक आपत्तीत जनावरे दगावली असल्यास तातडीने नुकसानभरपाईची नोंद करण्यात येईल. तसेच बिल्ले लावल्यामुळे आता जनावरांची खरेदी-विक्री करणे देखील सोपे होईल असे त्यांनी सांगितले.
(व्हिडिओ - सतीश तुळसकर)
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.
Recommended