फाळणीत बंधूभाव जोपासणारे देवदूत | Latest Marathi News I Live Marathi News | मराठी ताज्या बातम्या |
  • 3 years ago
धाबा (जि. चंद्रपूर) : भारत देश स्वातंत्र झाला. स्वातंत्र्याचा आनंदोत्सव देशात साजरा होत असतानाच अखंड भारत देशाची फाळणी झाल्याने देशातील हिंदू-मुस्लिम बंधूभावाला तळा गेला होता. हिंदू-मुस्लिम बांधव संशयी नजरेने एकमेकांकडे बघत होते. देशात दंगली उसळल्या होत्या. परिस्थिती हाताळण्यासाठी मुस्लिमबहूल भागात आर्मीच्या तुकड्या तैनात केल्या होत्या. अशा बिकट स्थितीत चंद्रपूर जिल्ह्यात येणाऱ्या धाबा गावातील हिंदू बांधवानी मुस्लिम बांधवाना स्वरक्षण दिले. ऐवढेच नाही तर लगतच्या हैद्राबाद संस्थानच्या सीमेपर्यंत मुस्लिम बांधवांना स्वरक्षणात सोडले. आर्मीच्या जवानांनाही गावाने पोटाशी घेतले. फाळणीमुळे उद्भवलेल्या वाईट परस्थितीत या गावाने बंधूभाव जोपासला. या घटनेचे काही साक्षीदार आजही हयात आहेत. त्यावेळी घडलेल्या चांगल्या आणि वाईट अनुभवाची शिदोरी त्यांनी आजही जपून ठेवली आहे.
(व्हिडिओ - नीलेश झाडे)

Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.
Recommended