'वंचित'चा सर्व कृषी अधिकारी कार्यालयांना घेराव घालण्याचा इशारा

  • 3 years ago
अकोला : अकोला : राज्यात तूर मूग उडीद पिकाचे उत्पादन घेणा-या शेतक-याना अस्मानी संकटासोबतच सुलतानी संकटाचा सामना करावा लागत आहे. विषाणूजन्य रोग पडल्याने झालेल्या नुकसानीची मदत देण्यासाठी पंचनामे करतांना अकोला जिल्ह्यात केवळ मुंग पिकाच्या पंचनाम्याचे आदेश देण्यात आले. अमरावती जिल्ह्यात मात्र मुंगासह उडीद पिकाचेही सर्वेक्षण केले जात आहे. अश्या पद्धतीने जाणीवपूर्वक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई पासून वंचित ठेवण्यात येत असून, कृषी विभागाने मूग, उडीद सोबतच पावसाने नुकसान झालेल्या तुर या अश्या तिन्ही पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश द्यावेत, अन्यथा पक्षाचेवतीने कृषी अधिकाऱ्यांना घेराव घालू असा इशारा वंचितचे राज्य प्रवक्ते राजेंद्र पातोडे ह्यांनी दिला आहे.

Recommended