लाकडी नंदीबैल विक्रीस; पण ग्राहक नाही Latest Marathi News I Live Marathi News | आजच्या ठळक बातम्या |
  • 3 years ago
वेलतूर (जि. नागपूर) ः विदर्भातील महत्त्वाचा सण पोळा जवळ आला. कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी पोळा घरीच साजरा करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. मुख्यता हा सण शेतकरीवर्गाचा बैलबारदाना पूजनाचा. मात्र, त्यावर यावर्षी गंडातर येणार हे निश्चित. सोबत पाडवा म्हणजे लहानग्याचा लाकडी बैल पूजनाचा व खेळण्यांचा दिवस. त्यावरही लॉकडाऊनचा पिरणाम होणार आहे. लाकडी नंदीबैल तयार करणारे ग्रामीण कारागीर व्यवसायाच्या अपेक्षेने लाकडी नंदीबैल घडवत आहेत. त्यांची रंगरगोटी करीत आहेत. त्यांना ग्राहकांची प्रतीक्षा आहे. यातून मिळत असलेला हंगामी रोजगार बुडणार असल्याने ते हवालदिल झाले आहेत. (व्हिडिओ - शरद शहारे)

Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.
Recommended