सीना लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना गुड न्यूज

  • 3 years ago
अहमदनगर : कर्जत, श्रीगोंदा आणि आष्टी या तीन तालुक्यातील सिंचन व पिण्याचे पाणी पुरवठा योजनेसाठी वरदान ठरलेले सीना धरण झाल्यापासून पहिल्यांदाच ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात भरले आहे. सध्या सांडव्यातून पाण्याचा विसर्ग सुरु आहे. २९ वर्षात प्रथमच हे धरण एवढ्या लवकर भरले आहे. नगर जिल्ह्यातील निळवंडे, मुळा धरणापेक्षा कितीतरी उशिरा, कधी कोरडे राहणारे हे धरण भरल्याने शेतकरी वर्ग सुखावला आहे. हे धरण भरल्याने सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनासुद्धा आनंद झाला आहे. नगर जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे सोलापूर जिल्ह्यातही सीना नदीला शनिवारी पाणी आले होते. धरण भरल्यानंतर सोलापूर व उस्मानाबाद येथील शेतीला याचा फायदा होतो. करमाळा तालुक्यातील तरटागाव बंधारा येथे शनिवारी नादीला पाणी आले. संगोबा बंधाऱ्यातून हे पाणी खाली गेले असून आता कोळगाव धरण भरेल अशी आशा शेतकऱ्यांना आहे. बातमी वाचण्यासाठी https://www.esakal.com/ahmednagar/first-time-bhandardara-dam-sina-dam-full-328974 या लिंकवर क्लिक करा

व्हिडीओ : अशोक मुरुमकर

#marathinews #viral #sakalmedia #sakalnews #esakal #trnding

Recommended