फरसबंदीचा मार्ग अन कासारी नदीची घळ... | Sakal Media |
  • 3 years ago
कोल्हापूर : विशाळगडाच्या मार्गावर असणाऱ्या पांढरेपाणीपासून सहा किलोमीटर अंतरावर पावनखिंडीचा परिसर. सिद्धी जौहरच्या सैन्याने बांदल मावळ्यांना पांढरेपाणी परिसरात गाठले. येथूनच रणसंग्रामाला सुरवात झाली असावी, असा इतिहास अभ्यासकांचा तर्क आहे. मात्र, पावनखिंडीतल्या ज्या घळीत लढाई झाल्याचा निर्देश करण्यात येतो, त्याबद्दल अभ्यासकांच्या मनात शंका आहे. विशेष म्हणजे ही घळ तेथे निर्माण झालीच कशी, या भोवती त्यांचा प्रश्‍न घुटमळतो आहे. भूगर्भशास्त्र अभ्यासकांनी पुढे येऊन या प्रश्‍नाची उकल करण्याची आवश्‍यकता आहे.

बातमीदार - संदीप खांडेकर

व्हिडिओ - बी. डी. चेचर
Recommended