नगर जिल्ह्यातील बलठण जलाशयाला गळती

  • 3 years ago
अहमदनगर : रत्नागिरी जिल्ह्यातील तिवरे धरण फुटल्याच्या दुर्घटनेला वर्ष झाले आहे. यातून सरकारने अद्याप काही धडा घेतल्याचे दिसत नाही. अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील बलठण जलाशयाची १२ वर्षातच दुरावस्था झाली आहे. काही ठिकाणी पाणी गळती होत असून याकडे गांभीर्याने न पाहिल्यास दुर्घटना होऊ शकते. २०२ दशलक्ष घनफूट क्षमतेचे बलठण जलाशय ५० टक्के भरण्याच्या मार्गावर आहे. जलाशयाच्या भिंती लगतच असणाऱ्या जागेत पक्षांची घरटी आहेत. गेटचे रबर सील, गळतीमुळे जलाशयाच्या भिंतीवर लंपटलेले शेवाळ, वाढलेले गवत, गंजलेली मशिनरी असे दृश्य येथे आहे.
#marathinews #viral #sakalmedai #esakal #nagarnews #treding

Recommended