दिनविशेष: जागतिक चहा दिन | #InternationalTeaDay |Sakal |SakalMedia
  • 3 years ago
आज जागतिक चहा दिन
चहा हा चहाप्रेमींसाठी अमृततुल्य म्हणूनच ओळखला जातो. प्रत्येकाच्या आयुष्यात चहा महत्वाचा असतो. विशेषतः भारतीय आणि चिनी लोकांमध्ये चहाची लोकप्रियता हि सर्वाधिक असून चहाचे सर्वात जास्त उत्पादन सुद्धा याच देशांत होते. चहाचे उत्पादन घेणाऱ्या प्रत्येक देशांत जागतिक चहा दिन हा १५ डिसेंबरला साजरा केला जात होता. सर्वात पहिला जागतिक चहा दिन भारतानेच २००५ साली साजरा केला होता. चहा हा चहा उत्पादन करणाऱ्या नव्हे तर संपूर्ण जगात पोहचावा म्हणून संयुक्त राष्ट्राने २१ डिसेंबर २०१९ रोजी २१ मे हा दिवस जागतिक चहा दिवस म्हणून घोषित केला आहे. यावर्षी आपण पहिला जागतिक चहा दिवस साजरा करत आहोत. जागतिक चहा दिवशी अस्सल चहाप्रेमींच्या आयुष्यात चहाचे महत्व सांगणारा हा व्हिडीओ.
व्हिडीओ: रफिक पठाण
विशेष आभार: ओंकार जोशी, कुशल कुबेर, अथर्व महांकाळ
Recommended