नेमके हे पीपीई कीट आहे तरी काय? त्याचा कसा उपयोग केला जातो.
  • 3 years ago
सयाजी शेळके : सकाळ वृत्तसेवा
उस्मानाबाद, ता. २० ः कोरोणाच्या संसर्गाच्या विरोधात वैद्यकीय अधिकारी निकराचा लढा देत आहेत. यामध्ये त्यांच्या स्वतःच्या सुरक्षेसाठी ‘पीपीई कीट‘ वाटपरात. नेमके हे पीपीई कीट आहे तरी काय? त्याचा कसा उपयोग केला जातो. जिल्हा स्त्री रुग्णालयातील वैद्यकीय अक्षीक्षक डॉ. सचिन देशमुख या पीपीई कीटबाबात माहिती सांगत आहेत.
कोरोणाचा संसर्ग झाल्यापासून ‘पीपीई कीट‘ ने नाव सातत्याने घेतले जाते. पीपीई म्हणजे ‘पर्सनल प्रोटेक्टीव इक्विपमेंट‘ होय. या किटमुळे कोरोणाच्या रुग्णाला योग्य प्रकारे हाताळता येते. यामध्ये कॅप, एन ९५ मास्क, फेसशिल्ड, गॉगल, गौन, लेगीज, ग्लोज असा समावेश असतो. कॅप ही डोक्यावर घातली जाते. तर एन ९५ मास्क नाकावर बांधले जाते. शिवाय फेसशिल्ड हे कपाळावर बांधून संपूर्ण चेहऱ्याचे संरक्षण होते. हे प्लॅस्टिकचे असते. शिवाय डोळ्याचे संरक्षण व्हावे, यासाठी गॉगल घातला जातो. त्यानंतर अंगात गौन घातला जातो. तर हातात ग्लोज बांधावे लागतात. कोरोणा विषाणू प्रामुख्याने डोळे, नाक आणि तोंडाच्या माध्यमातून शरीरात प्रवेश करतो. यासाठी हे तिन्ही अवयव पूर्णपणे संरक्षित ठेवावे लागतात. या कीटमधील सर्व वस्तु महत्वाच्या असतात. चांगल्या दर्जाचे पीपीई कीट्स उत्पादनासाठी योग्य दर्जाचा कच्चामाल लागतो. सध्या देशात अत्यत कमी संखेने मान्यताप्रात्प पीपीई कीट्स उपलब्ध आहेत. अर्थात मान्यताप्राप्त कीटचा दर्जा चांगला असतो. शासकीय यंत्रणेकडून या कीट्सला मान्यता घ्यावी लागते. यासाठी लागणारा कच्चामाल आपल्या देशात फारसा मिळत नसल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे याचे उत्पादन देशात मोठ्या प्रमाणात होत नाही. मात्र दुय्यम दर्जाचे उत्पादन भारतीय बाजारपेठेत उपलब्ध आहे. त्यामुळे अनेक वैद्यकीय अधिकारी सध्या अशा दुय्यम दर्जाच्या कीटचा वापर करताना दिसून येत आहेत. याबाबत वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञही अशी प्रतिक्रीया देतात.
-------
डॉ. सचिन देशमुख, वैद्यकीय अधीक्षक, जिल्हा स्त्री रुग्णालय, उस्मानाबाद.
.
.
#ppekits #ppe #coronavirus #coronavirusoutbreak #coronavirusupdates #covid19 #doctors #medicalstaff #news #sakal #sakalnews #localnews #osmanabad #maharashtra #marathinews #viral #viralnews #video #viralvideo #videos #viralvideos #experts #experttalk
Recommended