कोल्हापूरात ३० कुटुंबांनी घालून दिला असा आदर्श...

  • 3 years ago
घरी वेगवेगळ्या भाजी,फळभाजी लावायची आहे तर जाणून घ्या गार्डन क्लब कोल्हापूर ने घेतलेल्या स्पर्धेत सहभागी गार्डन प्रेमींचे व्हिडिओ...तुम्हाला नक्कीच होईल याचा फायदा..
संचारबंदीत घरातून बाहेर पडायचे मुश्‍कील. भाजीपाला खरेदीसाठी रस्त्यावर जाण्याची सोयच नाही. भाजीपाला नसेल तर जेवणाला चवच नाही. त्याची चिंता मात्र काही कुटुंबांना जाणवली नाही. टेरेसवरच पिकवलेल्या भाजीपाल्यावर त्यांनी ताव मारला. रस्त्यावर येऊन भाजीपाला खरेदीचा जे हट्ट धरतात, त्यांच्यासाठी त्यांनी संचारबंदीत वेगळा आदर्श घालून दिला आहे. जिल्ह्यातील जवळपास तीस कुटुंबे आहेत की त्यांना भाजीपाला खरेदीसाठी एकदाही बाहेर पडावे लागले नाही. वर्षभरात त्यांनी परसात, अंगणात, बाल्कनी आणि टेरेसवर भाजीपाला पिकवला. त्याच बळावर त्यांनी आतापर्यंत घरात तयार झालेली भाजीच वापरली. अजूनही पुढील एखादा महिना तरी त्यांना भाजी खरेदीची गरज भासणार नाही.

बातमीदार : नंदिनी नरेवाडी
व्हिडिओ : सुयोग घाटगे