गोंड आदिवासी झाले एका पावसात बेघर.!

  • 3 years ago
गोंड आदिवासी झाले एका पावसात बेघर.!
.
.
औरंगाबाद : दौलताबाद व परिसरात जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. माळीवाडा येथील गायरान जमिनीवर वास्तव्यास असलेल्या आदिवासी गोंड समाजाला कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या संचारबंदीने होणाऱ्या उपासमारीवर सोशल मीडियावर अपील केल्यावर पोलीस विभाग व समाजसेवकांनी दुपारी काही प्रमाणात अन्न धान्यासह पॅकलंच उपलब्ध करून दिले. पण गोणपाटाच्या झोपड्यात राहत असल्याने सायंकाळी झालेल्या अवकाळी वादळी वाऱ्यासह जोरदार झालेल्या पावसाने आस्मानी संकट आले असून वादळी वाऱ्यात सर्व झोपड्या उडून गेल्या आहेत. आता रात्र चिखलात उघड्या आभाळाखाली उपाशी काढावी लागणार आहे. परमेश्वरसुद्धा या गरीब कुटुंबाची किती परीक्षा घेतोय देव जाणो.
.
.
(व्हिडिओ : किशोर पाटील)
.
.
#sakal #coronavirus #coronavirusupdates #coronainmaharashtra #coronainindia #corona #news #aurangabad #rains #heavyrains #hailstorm #news #sakal #sakalnews #viral #viralnews #video #viralvideo #viralvideos

Recommended