महाशिवरात्रीनिमित्त लाखो भाविक त्र्यंबकेश्वर येथे दर्शनासाठी..!

  • 3 years ago
नाशिक/ त्र्यंबकेश्वर : बम बम भोले, हर हर महादेवचा गजर करत महाशिवरात्रीनिमित्त देशातील लाखो भाविक त्र्यंबकेश्वर येथे दर्शनासाठी दाखल...महादेवाच्या दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा

( व्हिडिओ - केशव मते/ अरूण मलाणी)



नाशिक/ त्र्यंबकेश्वर : आद्य ज्योतिर्लींग त्र्यंबकेश्वर येथे महाशिवरात्र उत्सव उत्साहात साजरा करण्यात येतोय. बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर येथे महाशिवरात्रीस देवस्थान संस्थान पेशवेकालीन परंपरेने वर्षभरात बारा उत्सव साजरे करीत असते. महाशिवरात्र हा एक प्रमुख उत्सव आहे. यादिवशी येथे देशविदेशातून भाविक दर्शन पूजाअभिषेक करण्यासाठी यंदा आले आहेत.
शुक्रवारी पहाटे ४ वाजता मंदिर उघडल्यानंतर त्यानंतर अहोरात्रौ भाविकांच्या दर्शनासाठी खुले असेल. त्यानंतर भगवान त्र्यंबकराजाची पालखी पाचआळीमार्गे कुशावर्त तीर्थावर व तेथून मेनरोडने त्र्यंबकेश्वर मंदिरात करण्यात येते. धर्मदर्शन हे पूर्वदरवाजा दर्शनबारीने भाविकांना मंदिरात सोडण्यात येत होते.