किरुंडे येथे जखमी बिबट्या आढळला..!

  • 3 years ago
किरुंडे येथे जखमी बिबट्या आढळला अधिक उपचारासाठी कोल्हापूर ला रवाना :-

वाई :- दि. किरुंडे ता. वाई येथे बुधवार दि १९ रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास वनक्षेत्रपाल महेश झांजुर्णे यांना मिळताच त्यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली असता बिबट्या किरुंडे गावाच्या हद्दीतील वनक्षेत्रातील ओढ्यात जखमी अवस्थेत पडलेला दिसला. त्याचे मागचे दोन्ही पाय लुळे पडले होते व त्या पायात जीव नव्हता, पाय ओढल्यामुळे जखमा झाल्या होत्या. त्याला पिंजरयत टाकून वाई येथे दुपारी आडीचच्या सुमारास आणले त्याच्यावर पशूवैद्यकीय अधिकारी पाठक यांनी तपासणी केली असता त्याला अर्धांग वायू झाल्याची लक्षणे दिसून आली. या नंतर त्याला अधिक उपचारासाठी कोल्हापूर येथे पाठविण्यात आले. त्याच्यावर यशस्वी उपचार झाल्यानंतर त्याला अधिवासात सोडण्यात येणार असल्याची माहिती मिळाली. उपवनसंरक्षक भारतसिह हाडा, सहाय्यक वनसंरक्षक व्ही बी भडाळे यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल महेश झांजुर्णे यांच्या पथकाने कारवाई केली. यावेळी परिसरातील नागरिक व पर्यावरण प्रेमींनी सहकार्य केले.

#Sakal #SakalMedia #news #viral #ViralNews #SakalNews

अधिक बातम्यांसाठी : www.esakal.com