Mahalaxmi Day 3, 2012

  • 3 years ago
महालक्ष्मीची अनघा दत्तलक्ष्मी रुपात पूजा
नवरात्रोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी आज श्री महालक्ष्मीची श्री अनघा दत्तलक्ष्मी रुपात पूजा बांधण्यात आली. गुरुवार व तृतीया तिथी असल्याने दत्तात्रेय व लक्ष्मी यांचे एकत्रित रुप म्हणजे अनघा दत्तलक्ष्मी. ज्ञान, संरक्षण व समृद्धी देणारे हे श्री महालक्ष्मीचे रुप मानले जाते. नरेंद्र मुनिश्‍वर, प्रसाद मुनिश्‍वर, ओम निरंजन मुनिश्‍वर यांनी पूजा बांधली. चंद्रकांत जोशी यांचा संकल्पना होती, तर विलास जोशी, रवी माईनकर यांचे सहकार्य लाभले.