पानचं ATM... ते ही चक्क पुण्यात

  • 3 years ago
पानाचे शौकीन आपल्या भारताच्या कानाकोपऱ्यात आढळतात. अगदी घराजवळच्या टपरीपासून ते बॉलिवूडमधील गाण्यांपर्यंत सगळीकडेच या पानाने आपली छाप सोडलीय. अनेकांना तर जेवणानंतर पान खाल्ल्याशिवाय चैनच पडत नाही. आजही अनेक पानाचे शौकीन स्वत:जवळ पानाची पेटी बाळगतात असं सांगितल्यास तुम्हाला आश्चर्य वाटणार नाही याची खात्रीय. अशाच पानाच्या शौकीनांसाठी नळ स्टॉप जवळ चक्क पानाचे एटीएम सुरू झाले आहे. होय तुम्ही बरोबर ऐकलं मी आता आहे भारतातील पहिल्या पानाच्या एटीएमजवळ आणि ते आहे आपल्या लाडक्या पुण्यात...

हौसेला मोल नाही म्हणतात त्याचप्रमाणे पानाच्या शौकीनांसाठी उभारण्यात आलेलं हे एटीएम ज्या दुकानात आहे त्याचं नावही 'शौकीन' असंच आहे. हे एटीएम काम कसं करत पाहुयात...

#panshop #shaukinpanshop #pune #coronavirus #maharashtra #viral2021

Recommended