2 years ago

उपमुख्यमंत्र्यांनी MPSC परीक्षेचं खापरं फोडलं बोर्डावर | Ajit pawar|MPSC exam| Student | Maharashtra

Sakal
Sakal
राज्यात एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्यावरून सध्या मोठा गोंधळ सुरु आहे. गुरुवारी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय़ घेतल्याचं समजल्यानंतर विद्यार्थ्यांनी रस्त्यावर येत आंदोलन पुकारलं होतं. त्यानंतर एमपीएससी आणि राज्य सरकार यांच्यात समन्वय नसल्याचंही दिसून आलं. आता एमपीएससी परीक्षा 21 मार्चला होणार असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी परीक्षेबाबत झालेल्या गोंधळाचं खापर एमपीएससीवर फोडलं आहे. त्यांनी म्हटलं की, एमपीएससीने हे प्रकरण व्यवस्थित हाताळायला हवं होतं. त्याआधी मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनीही म्हटलं होतं की, एमपीएससीने हा निर्णय परस्पर घेतला असून याबाबत मला अंधारात ठेवलं.

Browse more videos

Browse more videos