पहा कोण आहे फासावर जाणारी पहिली महिला कैदी शबनम

  • 3 years ago
स्वतंत्र भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच एका महिला आरोपीला फाशी देण्यात येणार आहे. उत्तर प्रदेशच्या मथुरा तुरुंगात महिलांना फाशी देण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे. फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी करण्यासाठी तुरुंगात तयारी सुरू करण्यात आली आहे.

मथुरा तुरुंगात १८७० मध्ये फाशीघर तयार करण्यात आले होते. मात्र, तुरुंगातील नोंदीनुसार, देश स्वतंत्र झाल्यानंतर या फाशीघरात एकाही कैद्याला फाशी देण्यात आलेली नाही. मथुरा तुरुंगातील या फाशीघराच्या दुरुस्तीचे काम आता सुरू झाले आहे. शबनम नावाच्या महिला आरोपीला फाशी दिली जाऊ शकते. या व्हिडीओ मध्ये आपण या मथुरा तुरुंगाविषयी जाणून घेऊ आणि सोबतच पाहुयात की ही शबनम नेमकी आहे तरी कोण आणि तिच्यावर कोणते आरोप आहेत.

#shabnam #amroha #india #mathura