असा असेल मरीन ड्राईव्ह ते वरळी-वांद्रे कोस्टल रोड
  • 3 years ago
करोनाच्या महासाथीमुळे रखडलेल्या मुंबईतील सागरी किनारा रस्ता प्रकल्पाने (कोस्टल रोड) पुन्हा वेग घेतला आहे. मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बालसिंग चहल या प्रकल्पाच्या आतापर्यंतच्या कामाबद्दल माहिती दिली. प्रिन्सेस स्ट्रीट ते वरळी वांद्रे सागरी किनारा मार्गासाठी तब्बल १२ हजार ७२१ कोटी रूपयांचा खर्च अपेक्षित आहे. गेल्या काही महिन्यांपासून या मार्गिकेच्या कामानं वेग पकडला असून नोव्हेंबर २०२० पर्यंत १ हजार २८१ कोटी रूपयांची कामं पूर्ण झाली असल्याचं चहल यांनी सांगितलं.
Recommended