महानायक अमिताभ बच्चन | राजेंद्र सोनार यांनी काढलेली चित्रे | Amitabh Bachhan | Wazir Online

  • 4 years ago
महानायक अमिताभ बच्चनला कोरोनाचा संसर्ग झाला आणि संपूर्ण देशालाच धक्का बसला. त्यांच्या चाहत्यांनी तर देवच पाण्यात टाकले. अमिताभ बच्चनचा अपघात असो किंवा निरनिराळ्या कारणाने तब्येत बिघडली असो, त्यांचे चाहते त्यांच्यासाठी काहीही करायला तयार होतात. असाच त्यांचा एक चाहता धुळ्यात आहे. ५५ वर्षीय राजेंद्र सोनार असे त्यांचे नाव. व्यवसायाने छायाचित्रकार असले तरी ते बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचे धनी आहेत. उत्तम चित्रकार आहेत. वयाच्या १० व्या वर्षी सन १९७३ मध्ये त्यांनी अमिताभ बच्चनचा ‘परवाना’ हा चित्रपट बघितला आणि तेव्हापासून त्यांना गुरु मानले. १९७६ मध्ये अमिताभसारखी हेअर कट राजेंद्र सोनार यांनी केली. ती आजही कायम आहे. त्यांच्या प्रत्येक वाढदिवसाला त्यांनी स्वत: रेखाटलेले चित्र ते अमिताभला पाठवितात. अमिताभला नियमित पत्रव्यवहार करतात. आतापर्यंत अमिताभची १६ तर त्यांचे वडील हरिवंशराय बच्चन यांची १२ पत्रे राजेंद्र सोनार यांना प्राप्त झाली आहे. सन १९८२ मध्ये अमिताभला अपघात झाल्यानंतर त्यांनी सत्यनारायणाची महापूजा केली आणि ते बरे होतपर्यंत पूजेतील सुपारी कमरेला बांधली. दोन दिवसांपूर्वी अमिताभ बच्चन यांना कोरोनाने ग्रासले हे माहिती होताच त्यांनी त्यांच्या तब्येतीसाठी प्रार्थना सुरू केली. स्वत: रेखाटलेली अमिताभची छायाचित्र असलेला एक व्हिडिओ तयार करून त्यांच्या महानतेची ग्वाही दिली. राजेंद्र सोनार यांनी साकारलेल्या या चित्रांचा हा व्हिडिओ खास ‘वजीर ऑनलाईन’च्या माध्यमातून अमिताभ बच्चनच्या चाहत्यांसाठी.....

Recommended