कोरोनानंतर चीनमध्ये प्लेगचं संकट…

  • 4 years ago
कोरोनानंतर चीनमध्ये आणखी एका आजाराचे संकट बळावलं आहे. ब्यूबोनिक प्लेगची दोन रुग्ण आढळल्यामुळे चीनमध्ये खळबळ उडाली असून अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोरोनाच्या संकटावर काही प्रमाणात मात केल्यानंतर आता चीनमध्ये आणखी एक संकट आलं आहे. उत्तर चीनमधील बयन्नुर शहरातील ब्यूबोनिक प्लेगचा फैलाव झाल्याने खळबळ उडाली आहे. मंगोलियाच्या स्वायत्त क्षेत्रातील बयन्नूर शहरातील ब्युबोनिक प्लेगचे दोन प्रकरणे समोर आली आहेत. संपूर्ण शहरात प्लेगच्या बचावासाठी तीन स्तरीय अलर्ट जारी करण्यात आला आहे.