महिन्याभरानंतरही शेतात पाणी, महिना उलटला तरी शेतकरी हवालदिल
  • 4 years ago
भोकरदन -संसाराची राख रांगोळी झाली पोटाला चिमटा देवून शेतात उभे केलेले पीक एका दिवसात होत्याचे नव्हते झाले डोळ्यासमोर कणसं वाहून गेले शेतात आणि डोळ्यात पाणी दोन्हीकडचे पाणी अजून तसेच आहे महिना उलटून गेला शेत अजून वाळले नाही सत्तेसाठी भांडणाऱ्या या नेत्यांना कधी आमची किंवा कधीच येणार नाही मतदान झाले आता त्याचा मतलबही संपला लिय लिव्हतात मात्र देत मात्र काहीच नाही लेकीचे लग्न पुढे ढकलावे लागले पैसे नाहीत म्हणून मुलगा घरी बसला, त्याची कॉलेजची फि भर ण्ण्यासाठी पैसे नाही घरात पावसाचे पाणी घुसले भींत कोसळली पुढे फक्त अंधार आहे काय करावे काहीच सुचत नाही सरकारी कचेरीच्या खेट्या मारल्या शिवाय आता काही पर्याय नाही त्यांना पाझर फुटेल तेव्हा फुटेल ही व्यथा आहे भोकरदन तालुक्यातील सुरंगळी येथील शेतकऱ्यांची अख्या मराठवाड्यात कमी अधिक प्रमाणात हीच परिस्थिती आहे शेतकऱ्यावर आलेल्या या आसमानी आणि सुलतानी संकटाचा दिव्य मराठीने भोकरदन तालुक्यातील गावांमध्ये प्रत्यक्ष जावून कलेलेा ग्राऊंड रिपोर्ट
Recommended