दिव्य मराठी दिवाळी अंक 2019 प्रकाशन सोहळा

  • 5 years ago
औरंगाबाद - तमाम मराठी साहित्यप्रेमींमध्ये दरवर्षी औत्सुक्य आणि चर्चेचा विषय असलेल्या "दिव्य मराठी'च्या दिवाळी अंकाचे 26 ऑक्टोबर रोजी प्रकाशन पार पडले एमजीएमच्या आइन्स्टाइन सभागृहात सकाळी 11 वाजता प्रख्यात साहित्यिक राजन खान, ज्येष्ठ लेखिका रेखा बैजल, प्रख्यात कलावंत-अभिनेते योगेश शिरसाट, सुहास शिरसाट, एमजीएम विद्यापीठाचे कुलगुरू डॉ सुधीर गव्हाणे यांच्या हस्ते हे प्रकाशन झाले यावेळी लेखक राजन खान यांच्या भाषणाने सर्वांचे लक्ष वेधले



या कार्यक्रमात दिव्यमराठीचे राज्य संपादक संजय आवटे, दिव्य मराठीचे बिझनेस हेड संदीप बिश्नोई, निवासी संपादक दीपक पटवे,दिव्य मराठीचे डेप्युटी एडिटर रुपेश कलंत्री, दिव्य मराठी नाशिकचे डेप्युटी एडिटर अभिजीत कुलकर्णी, रविंद्र भजनी, महेश रामदासी, इलेक्शन वॉर रूम टीम आणि इतर सहकारी उपस्थित होते याचवेळी DivyaMarathiCom च्या ऐपची घोषणा देखील करण्यात आली हे ऐप प्ले स्टोअरवर Divya Marathi या नावाने उपलब्ध आहे कार्यक्रमाचे सूत्र संचालन श्रीकांत सराफ यांनी तर रुपेश कलंत्री यांनी आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाचा समारोप केला

Recommended