रायगड : पोलादपूर बस दुर्घटना : बचावलेले प्रकाश सावंत देसाई यांची प्रतिक्रिया

  • 6 yıl önce
पोलादपूर बस दुर्घटना: रायगड : कोकणाला पश्चिम महाराष्ट्राशी जोडणाऱ्या पोलादपूरजवळ आंबेनळी घाटात एक खासगी बस 800 फूट दरीत कोसळली. या बसमध्ये चालकासह 33 जण होते, त्यापैकी 32 जणांचा मृत्यू झाला. हे सर्व दापोली कोकण कृषी विद्यापीठाचे कर्मचारी होते. धक्कादायक म्हणजे जो कर्मचारी वाचला, त्याने खोल दरीतून वर येत, मोबाईलला रेंज मिळाल्यानंतर कोकण कृषी विद्यापीठाला फोन करुन झालेल्या अपघाताची माहिती दिली. प्रकाश सावंत-देसाई असं या अपघातातून बचावलेल्या कर्मचाऱ्याचं नाव आहे. प्रकाश सावंत देसाई हे कोकण कृषी विद्यापीठाचे सहाय्यक अधीक्षक आहेत.

Önerilen