Subhash Velingakar Alliance Strategy Possible In Goa Election

  • 8 years ago
गोव्यातील आगामी निवडणुकीत महायुतीचा मानस असल्याचे संकेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे बंडखोर नेते सुभाष वेलिंगकर यांनी दिले आहेत. गोव्यामध्ये मातृभाषेतून शिक्षण द्यावे आणि इंग्रजी शाळांना मिळणारे अनुदान बंद करावे, या मताशी समविचारी पक्षांच्या पाठिंब्याने आगामी निवडणुकीचे रणशिंग फुंकण्यात काही अडचण नसल्याचे वेलिंगकरांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये स्पष्ट केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे बंडखोर नेते सुभाष वेलिंगकर यांना गोव्यामध्ये खंबीर पाठिंबा देण्यास शिवसेनेने यापूर्वी उत्सुकता दाखवल्याची चर्चा रंगली होती.