Trupti Desai Will Be Participating In Bigg Boss 9

  • 8 years ago
राज्यभरात महिलांच्या हक्कांसाठी आक्रमक आंदोलने करण्यासाठी प्रसिद्ध असणाऱ्या भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई लवकरच टेलिव्हिजनवरील ‘बिग बॉस’ या रिअॅलिटी शोमध्ये दिसण्याची शक्यता आहे. ‘बिग बॉस’ हा रिअॅलिटी शो नेहमीच त्यामधील स्पर्धकांमुळे आणि रंजकतेमुळे चर्चेचा विषय ठरला आहे. आधीच वादात अडकलेल्या किंवा शोच्या सेटवर वाद निर्माण करु शकतील अशाच काही स्पर्धकांची निवड ‘बिग बॉस’मध्ये केली जाते. याच पार्श्वभूमीवर तृप्ती देसाई बिग बॉसच्या आगामी सिझनमध्ये सहभागी होण्याची शक्यता आहे.