North Koreas Fifth Nuclear Test Sets Off Blast More Powerful Than Hiroshima Bombing

  • 8 years ago
उत्तर कोरियाने शुक्रवारी पाचव्यांदा सर्वात मोठी अणुचाचणी केल्याचा दावा केला. हिरोशिमावरील अणूबॉम्ब हल्ल्यापेक्षा या चाचणीची क्षमता अधिक जास्त होती, अशीही माहिती पुढे आली आहे. गेल्या दहा वर्षांमध्ये पाचव्यांदा उत्तर कोरियाने अणूचाचणी करून शक्तिशाली देशांना झटका दिला आहे. या चाचणीमुळे उत्तर कोरियातील अणुचाचणी स्थळ पुंगेरीमध्ये ५.३ रिश्टर स्केलचे कृत्रिम भूकंपाचे धक्केही जाणवले. उत्तर कोरियातील सरकारी वाहिनीने या चाचणीला दुजोरा दिला असून, तेथील हुकूमशहा किम जोंग यांनीही ही आतापर्यंतची सर्वात शक्तिशाली चाचणी असल्याचा दावा केला.

Recommended