मी नंदिनी... लहान मुलांत लहानपण शोधणारी .. मोठ्यांमध्ये मोठेपण जपणारी .. नोकरीसाठी म्हणून शिवम ला भेटले नि नोकरीच्या पलिकडे जाऊन त्याच्यात गुंतले .. नको म्हणून नाती टाळता येत नाहीत हे मला त्याला भेटल्यावर कळलं .. त्याची आवड माझी बनली ... नि तिथंच कुठेतरी माझं मी पण संपलं ...